ज्योतिष म्हणजे काय? हा सर्वसामान्य जनांना पडलेला प्रश्न. ज्योती म्हणजे प्रकाश इष म्हणजे ईश्वर असे हे प्रकाश देणारे, अंधारात सापडलेल्या माणसाला मार्ग दाखवणारे शास्त्र आहे.ज्योतिष का बघावे, कधी बघावे याचे देखील काही नियम काही पध्दती आहेत. फलज्योतिष, कृष्णमुर्ती ज्योतिष, मेदनीय ज्योतिष अश्या अनेक पध्द्तीने माणसांचे भविष्य वर्तवता येते. कुठलाच मार्ग सापडत नसेल किंवा कोणता मार्ग निवडावा या बाबत संभ्रम असेल तर अथवा सर्वच मार्ग संपले असतील अश्याच वेळेला ज्योतिष बघावे.

संपुर्ण विश्वासाने आणि श्रध्देने बघितलेले ज्योतिषच जातकाला लागू पडते. माणसाच्या जीवनात येणारे शुभ अशुभ काळ ज्योतिष शास्त्राव्दारे जाणून घेता येतो.कुठलाही ज्योतिषी जातकाचे नशीब बदलू शकत नाही, मात्र एखादा निश्ष्णात ज्योतिषी जीवनातील शुभ अशुभ काळाचे अचुक मार्गदर्शन करुन तो जातक कसा सुखी होईल अथवा त्याच्या संकटाचे तीव्रता कशी कमी होईल एवढे मात्र सांगू शकतो. अशुभत्वावर अपयशावर मात करुन उत्तुंग यश मिळण्यासाठी ज्योतिष बघावे.