आपण राह्त असलेली वास्तु ही वास्तुशास्त्राप्रमाणे आहे का? हा सर्वसामान्य माणसांना पड्लेला प्रश्न. मुळतःच वास्तु ही पंचतत्वावर अवलंबुन आहे. आकाशतत्व, वायुतत्व, अग्नीतत्व, जलतत्व आणि पृथ्वीतत्व. या पाच तत्वावर वास्तुशास्त्र अधारीत आहे. नुसते चार भिंती उभारल्या म्हणजे वास्तु होत नाही. तर ज्या जागेवर (भुमीवर) वास्तु उभारतात ती भुमी पण महत्वाची आहे. 

 आपण वास्तुशास्त्राप्रमाणे घर बांधुन देखील नीट होत नाही याचे मुख्य कारण म्हणजे ज्या भुमीवर वास्तु निर्माण केली आहे.भुमीची योग्य निवड होणे गरजेचे आहे. वास्तुमधील चांगल्या व वाईट उर्जा माणसाच्या विचारशक्‍तीवर, स्वभावावर, कृतीवर कळत नकळत परिणाम करत असतात. एखाद्या वास्तुत गेल्यावर मन प्रसन्न होते तर एखाद्या वास्तुत माणसाला सुखाने झोप पण लागत नाही.