मुहुर्त म्हणजे एखादे कार्य करण्यासाठी निवडलेली योग्य वेळ. विश्वास असलेली आणि नसलेली माणसेही अरे बघ! जरा वेळ चांगली आहे क असे बोलूनच कोणत्याही कामाला सुरवात करतात. 

मनुष्य आजच्या घडीला जन्मापासुन ते मनुष्यच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाच्या कामाकरीता ती व्यक्‍ती योग्य वेळ शोधत असते. उदा. सिझेरीयन कधी करावे, बारसे कधी करावे, कान कधी करावे, जावळ कधी करावे, कान कधी टोचावे, मुंज कधी करावी, विवाह कधी करावा, निवडणुकीचे फॉर्म कधी भरावे, नवीन व्यवसायाला सुरवात कधी करावी या आणि अश्या इतर अनेक गोष्टींसाठी मुहुर्त पाहीले जातात. 

निश्ष्णात ज्योतिषाचा सल्ल्याशिवाय घेतलेला मुहुर्त हा मनुष्याला अपयश देवु शकतो. कारण मुहुर्त हा त्या व्यक्‍तीच्या पत्रीकेनुसार व होराशस्त्रानुसार काढला जातो.